सीजीएचएस हॉस्पिटल ला उदघाटनाचा मुहूर्त सापडेना!

सीजीएचएस हॉस्पिटल ला उदघाटनाचा मुहूर्त सापडेना!
*कर्मचाऱ्यांना घालाव्या लागतात नागपूरच्या फेऱ्या*.
भद्रावती:- केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरता अथक परिश्रमाने व पाठपुराव्याने चंद्रपूर येथे सी .जी. एच. एस. हॉस्पिटल मंजूर होऊन त्याची जागाही निश्चित झालेली आहे व येथे कर्मचारी सुद्धा नियुक्त झाल्याचे समजते मात्र बराच काळ लोटूनही अध्यापही या हॉस्पिटलच्या उदघाटनाचा मुहूर्त सापडत नसून मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करण्याचा अट्टाहास असल्यामुळे या हॉस्पिटलचे उदघाटन रेंगाळत चालले आहे. याचा फटका मात्र जिल्ह्यातील केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला बसत असून त्यांना आरोग्य तपासणीसाठी अद्यापही नागपूरला  फेऱ्या माराव्या लागत आहे.
यापूर्वी सदर हॉस्पिटल केवळ नागपूर येथे होते मात्र चंद्रपूर जिल्ह्यात केंद्रीय सेवा नियुक्तनिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांना उपचारासाठी नागपूरला जावे लागत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. हे हॉस्पिटल चंद्रपूर येथे व्हावे यासाठी संबंधित संघटनांकडून शासनाकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा केला व हे हॉस्पिटल चंद्रपूरला मिळावे म्हणून त्यांनी उच्च न्यायालयापर्यंत ची लढाई सुद्धा लढली होती. या सर्वांच्या प्रयत्नाने तथा  परिश्रमाचे फलित म्हणून सदर हॉस्पिटल चंद्रपूर येथे मंजूर झाले. या हॉस्पिटलसाठी चंद्रपूर येथील बी.एस.एन.एल ची  इमारत देण्यात आली. या इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध करून ही इमारत हॉस्पिटल साठी सज्ज करण्यात आली. अशीही माहिती आहे, की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथे डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, सफाई कामगार, लिपिक व सुरक्षा रक्षक आदींची नियुक्तीही करण्यात आली. मात्र या हॉस्पिटलचे उदघाटन मंत्र्यांच्याच हाताने करावयाचे असल्याने व त्याची तारीख मिळत नसल्याने उदघाटन रेंगाळत चाललेले आहे.हे उदघाटन रेंगाळल्याने कार्डधारकांना अद्यापही नागपूरला जावे लागत असून त्याचा त्रास या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होत आहे. त्यामुळे हे सेवानिवृत्त कर्मचारी या हॉस्पिटलच्या उदघाटनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
* हॉस्पिटल तयार असले तरी अद्याप त्याचे उदघाटन करण्यात आले नाही. उदघाटनासाठी मंत्र्याच्या तारखेची वाट पाहत असल्याचे समजते, मात्र मंत्र्यांच्या तारखा घेण्याच्या प्रयत्नात उदघाटन लांबणीवर जात आहे. याचा त्रास आम्हाला भोगाव लागत आहे. हॉस्पिटलचे उदघाटन त्वरित करून कार्डधारकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.
               

Comments