कोळसा खाण कंपनी अरबिंदोचा भुमिपूजन कार्यक्रम संतप्त गावकऱ्यांनी उधळून लावला

कोळसा खाण कंपनी अरबिंदोचा भुमिपूजन कार्यक्रम संतप्त गावकऱ्यांनी उधळून लावला

प्रकल्पग्रस्तांशी संवाद न साधता कंपनीचा मुजोरीचा प्रयत्न 

  भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांची दिशाभूल करीत कोळसा खाणीचे भुमिपूजन गुपचूपपणे करण्याचा अरबिंदो रिअलिटी अँन्ड इन्फास्टक्चर कंपनीचा डाव गावकऱ्यांनी उधळून लावला. अगोदर प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांशी जमिनीचा योग्य दराबाबत चर्चा करा नंतर कंपनीचे काम सुरू करा असा इशारा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे रौद्र रूप पाहून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम न करता माघारी परतले.
अरबिंदो कंपनीचे समर्थन करणार्या भाजपा तालुका उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांचा प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्याचा प्रयत्न गावकर्यांनी धुडकावून लावला.
टाकळी, जेना, बेलोरा (उत्तर) व टाकळी. जेना, बेलोरा (दक्षिण) कोल ब्लाँक हा अरबिंदो रियालीटी, अँन्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाला आहे. हि कंपनी गावकर्यांशी कुठलाही संवाद न साधता बळजबरीने काम करित आहे.   23 आक्टोबरला अरविंदो कंपनीने भुमीपुजनाचा कार्यक्रम ठरविला होता.
 कंपनीने गावकऱ्यांना पूर्व सूचना न देता भुमिपूजन कार्यक्रम आयोजित केला. हि बाब माहित होताच, बेलोरा गावच्या सरपंच संगिता देहारकर, उपसरपंच प्रविण बादूरकर , पानवडाळा चे सरपंच प्रदिप महाकुलकर, भटाळीचे सरपंच सुधाकर रोहनकर व सर्व प्रकल्पग्रस्तांनी घटनास्थळी जाऊन  कार्यक्रम थांबविला व कंपनीचा निषेध केला. कंपनीने कुठलेही काम गावकऱ्यांशी सवांद साधून करावे अन्यथा कंपनीला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी कंपनीला दिला.

Comments