कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार

  कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार बातमी:warora वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे राहणारे नरेंद लटारी थेरे (वय 40, ड्रायव्हर) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे की, त्यांच्या पुतण्या प्रज्वल प्रमोद थेरे याने एक वर्षापूर्वी उसने घेतलेले 10,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. नरेंद यांच्या म्हणण्यानुसार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावाच्या नंदोरी येथील घरी गेले असता, त्यांनी पुतण्याकडे पैसे परत मागितले. त्यावरून भांडण झाले आणि प्रज्वलने लाकडी काठी आणून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, मांडीवर व हातावर प्रहार केले. दरम्यान, भाऊ आणि वहिनीने हस्तक्षेप करून काठी हिसकावून घेतली. मात्र, प्रज्वलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नरेंद यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .................

पुनर्वसन जामणी ग्राम पंचायत मधील अविरोध निवडून आले नवनिर्वाचित पदाधिकारी याची प्रहार सेवक यांनी घेतली भेट

पुनर्वसन जामणी ग्राम पंचायत मधील अविरोध निवडून आले नवनिर्वाचित पदाधिकारी याची प्रहार सेवक यांनी घेतली भेट 

चिमूर : - चिमूर तालुक्यातील पुनर्वसन जामनी ग्राम पंचायत मधील निवडणूक प्रकियेमधून सरपंच व ग्राम पंचायत सदस्य अविरोध निवडून आल्याने प्रहार सेवक इंद्रशाम मडावी, प्रहार सेवक शेरखान पठाण, प्रहार सेवक विनोद उमरे  यांनी अविरोध पदाधिकारी यांची भेट घेऊन स्वागत केले.अविरोध सरपंच पदावर सौ. महानंदा मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य कैलास अलाम,रामदास नैताम, प्रमोद धारणे, अर्चना धारणे, दिशा कोयचाडे, अनिता उईके यांची निवड झाल्याने भेट घेऊन अभिनंदन केले.

Comments