वरोरा येथील एकोना कोल माईन्स मध्ये जनरल मजूर या पदावर नियुक्तीचा ऑर्डर काढून देण्यासाठी 5 लक्ष रुपयाची फसवणूक

वरोरा येथील एकोना कोल माईन्स मध्ये जनरल मजूर या पदावर नियुक्तीचा ऑर्डर काढून देण्यासाठी  5 लक्ष रुपयाची फसवणूक

चेतन लूतडे वरोरा 

वरोरा तालुक्यातील चरूरखटी गावातील घरकाम करणाऱ्या एका महिले कडून ऐकोणा कोल माईन्स मध्ये जनरल मजूर नियुक्तीचा ऑर्डर काढून देण्यासाठी पाच लक्ष रुपयेची उखळणी करण्यात आली असून  या प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे यांनी पत्रकार परिषद घेत कोळसा खदानितिल भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. त्यामुळे बरेच अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
[10/15, 12:11 AM]  वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथील सुनीता महादेव बेलेकर ह्यांना वडिलाकडून मिळालेली दोन एकर शेती होती. ती शेती सन २०२१ मध्ये माजरी एरिया अंतर्गत येणाऱ्या एकोणा कोल माईन्समध्ये गेली. नियमाप्रमाणे आर्थिक मोबदला व कोळसा खाणीत तिच्या मुलाला नोकरीची मिळाली. ३० जून २०२२ च्या आदेशानुसार वेकोलिने प्रफुल्ल महादेव बेलेकर (२४) याचा सुरक्षारक्षक पदावर नियुक्तीचा आदेश काढला, परंतु त्याची आयटीआयची परीक्षा असल्याने व त्याला जनरल मजूर या पदावर नियुक्ती पाहिजे असल्याने त्याने नियुक्ती आदेश स्वीकारला नाही.

सामान्य मजूर पदावर नियुक्ती आदेश काढून देण्यासाठी त्यांना बंडू पंढरी नांदे ह्याने युवराज ईश्वर मोरे रा. वरोरा याच्याशी संपर्क संपर्क करवून दिला. मोरे यांनी मुलाला जनरल मजूर म्हणून नियुक्ती हवी असल्यास तसा अर्ज वेकोलिच्या नागपूरमधील सीएमडी ऑफिसमध्ये करण्यास सांगितले. तसेच त्यानंतर एक महिन्यात मी तुमच्या मुलाचा जनरल मजूर या पदावर नियुक्तीचा ऑर्डर काढून देतो, असे सांगून त्याकरिता पाच लाख रुपये खर्च येईल, असे मोरे यांनी सांगितल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

 मोरे ह्यांनी त्या महिलेचा विश्वास संपादन केला व पाच लाख रुपये दिल्यास नियुक्ती आदेश काढून देण्याची खात्री दिल्याने  २७ जून २०२२ रोजी बंडू पंढरी नांदे व पती महादेव साधू बेलेकर यांच्यासोबत जाऊन त्या महिलेने युवराज मोरे यांना त्यांच्या घरी दोन लाख रुपये दिले. त्यानंतर २९ जून २०२२, ११ जुलै २०२२ व त्यानंतर १२ जुलै २०२२ ला प्रत्येकी एक लाख याप्रमाणे पाच लाख रुपये युवराज मोरे याला दिले. परंतु पैसे दिल्यानंतरही जनरल मजूर पदाचा आदेश निघाला नाही. यामुळे ते हतबल झाले आणि पाच लाख रुपये परत मागण्यासाठी युवराज मोरे यांच्याकडे तगादा लावला. परंतु मोरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेने 13 ऑक्टोबर रोजी वरोरा पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

 युवराज मोरे यांनी आपली पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे त्या महिलेचे म्हणणे असून त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकारामुळे वेकोलित नोकरी लावून देण्याच्या किंवा बदलीच्या बहाण्याने लुटणारे रॅकेट तर कार्यरत नाही ना, अशीही शंका निर्माण झाली आहे. परिणामी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केली आहे. तसेच याविरुद्ध आंदोलन उभारणार असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.

Comments