वरोरा येथील आर एफ ओ ची तक्रार करणाऱ्या वनरक्षकारावर चाकूहल्ला

वरोरा येथील आर एफ ओ ची तक्रार करणाऱ्या वनरक्षकारावर चाकूहल्ला
वरोरा
वरोरा येथील वादग्रस्त वनपरिक्षेत्र अधिकारी एम.पी.राठोड यांच्या कडून 15दिवसांपूर्वी वनरक्षकाला शिविगाळ करूंन चाकूने भोसकण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची तक्रार पोलीस व कनिष्ठ अधिकाऱ्याकडे केल्यानंतर सहाय्यक वनरक्षकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असताना वनरक्षक संदीप वाटेकर यांच्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान घडली या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली असून वृत्त लिहीस्तोवर कारवाई सुरू होती.

Comments