महागाई विरोधातील आंदोलनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना अटक*

*महागाई विरोधातील आंदोलनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना अटक* 

*वरोऱ्यात महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर* 

चंद्रपूर : केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यामध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. वरोऱ्यात पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. वरोऱ्यात पोलिसांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर  यांना ताब्यात घेतलं. 

यावेळी शहर काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास टिपले, गणेश काळे, पुरुषोत्तम पावडे, राजेंद्र बन्सोड, प्रदीप घागी, तन्वीर शेख, प्रफुल आसुटर, राहुल देवळे, मयूर वीरूटकर, निखिल राऊत, सुरज बावणे, अनिरुद्ध देठे, मिलिंद भोयर, राजेश महाजन,सूरज गावंडे, प्रमोद नागोसे, शेख रिजवान शेख रसूल, वसंता उमरे, शेख मोहिद्दीन, रवींद्र धोपटे, अरुण बरडे, सुरेश मेश्राम, पुरुषोत्तम पावडे, यशोदा खामणकर, शिरोमणी स्वामी, दीपाली मोरे, सरिता सूर, प्रतिभा सोनटक्के, रत्नमाला अहिरकर, मीना राहटे, माया साळवे, शीतल गेडाम, लता इंदूरकर, मंगला पिपळकर, अभिमान काळे, विशाल बदखल, राजेंद्र चिकटे यांची उपस्थिती होती.                

सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या महागाई विरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. दरम्यान या आवाहनानुसार आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे सह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरुध्द घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला. 

सर्वसामान्य नागरीकांना रोज लागणा-या आवश्यक वस्तुंवर सुध्दा जीएसटी लावण्यात आल्याने खादयपदार्थांची दरवाढ झाली आहे. या भाववाढीने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले असले तरी सरकार मात्र दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे कॉग्रेसने आज देशभर आंदोलन केले. वरोरा - भद्रावती तालुक्यात मोठया प्रमाणात पुराने शेती खरडून गेली.  मात्र, मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये सुध्दा सरकार विरुध्द संताप आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयांच्या विरोधात अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. आज वरोरा येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतुत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Comments