स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रहार चे आंदोलन

स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रहार चे आंदोलन

वरोरा
चेतन लूतडे

जीएमआर विद्युत निर्मिती कंपनीमध्ये बेरोजगारांना काम देण्यासाठी प्रहार तालुका अध्यक्ष किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन अटक करून सुटका करण्यात आली.

शुक्रवारी सकाळी प्रहार संघटनेतर्फे जीएमआर विद्युत निर्मिती कंपनी विरोधात स्थानिकांना रोजगार देण्याबाबत आंदोलन उभारण्यात आले. मागील काही दिवसापासून या कंपनीमध्ये परप्रांतीय कामगारांना घेण्याचे काम जोरात सुरू होते याबाबत ठोस पुरावे गोळा करून याचा विरोध करत प्रहार चे किशोर डुकरे यांनी विचारणा केली असता कंपनी प्रशासनाकडून उडवा उडवी चे उत्तरे मिळाल्याने शुक्रवारी एकदिवशीय आंदोलन कंपनीच्या परिसरात करण्यात आले. यावेळी कंपनी प्रशासनाने पोलिसांची मदत घेत आंदोलन उधळून लावले सर्व आंदोलकाना पोलीस स्टेशन वरोरा येथे नेऊन तंबी देण्यात आली व सूचनेवर सोडण्यात आले. 
मात्र कंपनी प्रशासनाला कोणतीही चौकशी याबाबत करण्यात आली नाही किती कामगार या ठिकाणी आलेले आहेत याचाही ठाव ठिकाणा पोलिसांना नाही. त्यामुळे भविष्यात प्रहार संघटनेतर्फे भव्य आंदोलन करण्याचा इशारा किशोर डुकरे यांनी दिला आहे.

कंपनी प्रशासनाला विचारले असता विद्युत कंपनीने मेंटेनन्स साठी पाचशे कामगार बोलावले असून पंधरा ते वीस दिवसात हे काम पूर्ण करतील असे कळविण्यात आले.

Comments