हर घर तिरंगातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे : आमदार प्रतिभा धानोरकर*

*हर घर तिरंगातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे :  आमदार प्रतिभा धानोरकर*

चंद्रपूर :- 
तिरंगा प्रत्येकाच्या मनात आहे. या तिरंग्याबद्दल आम्हा सर्व भारतीयांना नितांत आदर आहे. संपूर्ण कुटुंबासोबत हा आदर व्यक्त करण्याची संधी यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीयांना भेटली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, अशी अपेक्षा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.  

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रध्वज लावण्याबाबत जनजागरण करण्यासाठी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आज 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. 

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.

जिल्हा क्रीडा संकूल बॅटमिंटन हॉल गेट येथून सायकल रॅलीला सुरवात झाली.  मित्रनगर, केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, जटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, परत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान आणि जिल्हा क्रीडा संकूल येथे समारोप झाला. 

सदर रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकल क्लब, विविध क्रीडा मंडळे, नागरिक, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, क्रीडाप्रेमी यांनी सहभाग घेतला होता.

Comments