चंदनखेडा येथे हरघर तिरंगा रॅलीचे आयोजन

चंदनखेडा येथे हरघर तिरंगा रॅलीचे आयोजन

भद्रवती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे हर घर तिरंगा या विशेष उपक्रम बाबत जण जागृती करण्या करिता शालेय विद्यार्थी व गावकरी यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली
       तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे शासनाच्या आदेशाचे पालन करत ग्रामपंचायत , व जिल्हापरिषद शाळा चंदनखेडा, चंदनखेडा मक्ता नेहरू विद्यालय चंदनखेडा व गावातील नागरिक महिला पुरुषयांच्या सहकार्याने  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधी साठी  शासनाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे हर घर तिरंगा या उपक्रम बाबत लोकांच्या मनात स्वातंत्र्य बद्दल तसेच आपल्या स्वातंत्र्या साठी ज्या महान थोर पुरुषयांनी आपल्या प्राणाची आहुती दिली यांच्या बाद्दल देश भावना जागृत करण्यासाठी हरघर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती व पसिद्धी करण्यात आली या पसिद्धीच्या प्रभात फेरी मध्ये गावचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ ताई उरकांडे तसेच ग्रामविकास अधिकारी किशोर नाईकवार तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री बंडुजी निखाते श्री नानाजी बागडे, सौ, मुक्ताताई सोनूले सौ प्रतिभा दोहतरे  श्री निकेश भागवत, सौ रंजना हनवते सौ सविता गायकवाड , सौ श्वेता भोयर सौ आशा ननावरे, शाळा व्यवस्थापन समितिचे आध्यक्ष श्री अनिल कोकुंडे, तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका गावाती महिला व पुरुष तसेच युवा वर्ग उपस्थित होते।।

Comments