भूसंपादन करतांनाच नोकरी देण्याचा कालावधी निश्चित करा*

*भूसंपादन करतांनाच नोकरी देण्याचा कालावधी निश्चित करा*

*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सूचना* 

*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत वेकोलिच्या महत्वाच्या विषयांवर चर्चा*

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या खाणी तसेच खाजगी ब्लॉक देखील असून काही प्रस्तावित आहेत. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जमिनी अघिग्रहीत करण्यात येते. अधिग्रहित झाल्यानंतर जमीन मालकाला नोकरी देणे बंधनकारक असते. परंतु अनेक दशके लोटून देखील विविध कारणांनी भूमीस्वामी नोकरीपासून वंचित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे भूसंपादन करतांना नोकरी देण्याचा कालावधी निश्चित करण्याची लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र सरकारला पाठविण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. यासोबत विविध समस्या मार्गी लावण्याकरिता खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. 

                यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, उपविभागीय अधिकारी घुगे, वेकोलिचे वणी क्षेत्र महाप्रबंधक आभाशचंद्र सिंग, चंद्रपूर क्षेत्राचे वेकोलिचे अधिकारी साबीर, माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक गुप्ता, बल्लारपूर व वणी नॉर्थ चे अधिकारी,   जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांची उपस्थिती होती. 

                        आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी याप्रसंगी महत्वाच्या प्रश्नावर सूचना केली, त्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्पग्रस्तांचे नोकरीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्यात जे प्रश्न न्यायप्रविष्ट आहे किंवा काही कारणाने तांत्रिकदृष्ट्या अडलेले आहेत, अशी प्रकरणे तसेच ठेवत उर्वरित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना तात्काळ नोकरी देण्याची कारवाई करण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र शासनाद्वारे केलेल्या दरवाढीला ९ वर्षाचा दीर्घ कालावधी लोटला आहे. त्यामुळे वाढीव मोबदला देण्या करिता शासन निर्णयात बदल करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहे.

Comments