चरूर घारापुरे येथील शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन

चरूर घारापुरे येथील शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन

भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम  चंदनखेडा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा चरुर घारापुरे येथील शुद्ध पाण्याच्या प्रकल्पाचे उदघाटन सोहळा मा. आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते पार पडला
            तालुक्याती चंदनखेडा ग्राम पंचायत हे नेहमी नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या बाबत नेहमी प्रयत्न शील असते. अशातच वरोरा भद्रावती या क्षेत्राचा आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांच्या कडे मौजा चरूर घारापुरे येथे शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभारण्याची मागणी चंदनखेडा ग्रामपंचायत चे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यानी रेटून धरली त्यांच्या या मागणीला साथ देत मा.आमदार  यांनी माहापारेशन व महानिर्मिती यांच्या सामाजिक बांधिलकी निधी अंतर्गत शुद्ध पाण्याचे प्रकल्प मंजूर केले या शुद्ध पाण्याचे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने आज दिनांक २०/०८/२०२२ रोजी मा. आमदार सौ प्रतिभा ताई धानोरकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आणि नागरिकांच्या सेवेत कार्यन्वित करण्यात आले या वेळी गावचे सरपंच श्री. नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे ग्रामपंचयत सदस्य श्री निकेश भागवत श्री. नाना बगडे, सौ मुक्ता सोनूले, सौ प्रतिभा दोहतरे सौ आशा ननावरे, सौ रंजना हनवते सौ. सविता गायकवाड श्री बंडू निखाते सौ श्वेता भोयर तसेच या क्षेत्राचे सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीरभाऊ मुडेवार श्री ईश्वरजी धांडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

Comments