कार्यकारीणी सदस्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून करणार साजरा
वन परिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांचे वृक्षारोपणास सहकार्य
भद्रावती : ग्राहक पंचायत, भद्रावती यांच्या साप्ताहिक बैठकीत दि.०३/०८/२०२२ रोजी "पर्यावरण विषयक" एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
ग्राहक पंचायतच्या भद्रावती शाखेतील कार्यकारीणी मध्ये एकुन १५ सदस्य ग्राहक पंचायतीचे कार्य करतात आणि मागील तिन वर्षापासुन सर्व सदस्यांचा वाढदिवस ग्राहक पंचायतीचे संपुर्ण सदस्य मिळुन साजरा करण्यात येत आहे.
साप्ताहिक बैठकीत
दि.०४/०८/२०२२ नंतर ज्या सदस्यांचा वाढदिवस येणार त्या सर्व सदस्यांचे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किमान १०-१५ झाडे लावण्यात येणार, झाडे अशाच ठिकाणी लावणार ज्या ठिकाणी लावलेल्या झाडांचे संगोपन होणार. अशा पध्दतीने वर्षभरात ग्राहक पंचायत किमान १५०-२२५ वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करेल.
या संदर्भात दि. ०४/०८/२०२२ ला वन परिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे साहेब यांना पत्र देवुन वृक्षारोपणासाठी लागणारे झाडे उपलब्ध करून द्यावी असे पत्र देण्यात आले. शेंडे साहेब यांनी होणाऱ्या उपक्रमाची प्रसंशा केली आणि वन परिक्षेत्र कार्यालय, भद्रावती कडुन वृक्षारोपण उपक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पुरुषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, प्रविण रामचंद्र चिमुरकर, सुदर्शन तनगुलवार आणि मोहन मारगोनवार यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment