स्वातंत्र् दिनानिमित्त व अमृत महोत्सव माध्यमातून काढण्यात आली १०० मीटर तिरंगा यात्रा.

स्वातंत्र् दिनानिमित्त व अमृत महोत्सव माध्यमातून काढण्यात आली १०० मीटर तिरंगा यात्रा.

संपूर्ण भारतात स्वतंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव माध्यमातून घरोघरी तिरंगा जल्लोषात साजरा केला जात आहे. या अभियानाअंतर्गत भद्रावती शहरातील घरोघरी तिरंगा फडकवत  थाटात उत्सव साजरा करण्यात आला. स्वतंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सव भद्रावती शहरात दिसत आहे. स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य 100 मीटर तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या रॅली दरम्यान शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे, प्रशांत शिंदे, ठाणेदार गोपाल भारती, सुनील नामोजवार, ज्ञानेश्वर डुकरे, सुधीर सातपुते, डॉ. विवेक शिंदे, संतोष आमने, रोहन कुटेमाटे, बंग, हर्षल शिंदे,  तथा शहरातील विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतातील लोक त्यांच्या सोबत स्वतंत्रताच्या 75 वर्ष हा सण साजरा करीत होते.

Comments