आजादी गौरव पदयात्रा भारतीय स्वतंत्र्याच्या ७५ वर्षा निमित्त स्वतंत्रताच्या जाजवल्य इतिहास आणि भारताच्या जडणघणीतील काँग्रेसचे योगदान जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने काँग्रेस तर्फे आजादी गौरव पदयात्रा दिनांक १३ ऑगस्ट सकाळी दहा वाजेपासून शेगाव -खेमजई-येनसा-वरोरा-नंदुरी- आंबेडकर चौक भद्रावती या मार्गे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात ४ वाजता दाखल झाली.
यानंतर आंबेडकर चौक मध्ये पोहोचल्यानंतर खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यअर्पण करण्यात आले.
यानंतर येथे जनसभा आयोजित करण्यात आली यावेळी खासदार बाळू भाऊ धानोरकर सगळ्यांना संबोधित करताना म्हणाले की केंद्रातील मोदी सरकार हे लुटारू सरकार असून 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर , शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजू चिकटे, भद्रावती शहराध्यक्ष सुरज गावंडे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, राजू महाजन प्रदीप बुराण, अनिल झोटींग, सविता सूर, रत्नमाला अहिरकर, दिपाली माटे, सुनंदा जिवतोडे, सूरज गावंडे, विनयबोधी डोंगरे, प्रशांत काळे, सरिता सूर, वर्षा ठाकरे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, दातारकर ताई, निमकर ताई, गेडाम ताई, ढुमणे ताई, निखील राऊत, अक्षय बोंडे, गितेश सातपुते, सुधीर खोब्रागडे, सुधीर पारखी, विवेक आकोजवार, रवींद्र धोपटे, वसंतराव विधाते, गिरीधरजी विजय कष्टी, माधव कोटकर, विजय आत्राम, विकास डांगरे, विशाल וי बदखल, मयूर विरुटकर, सुरेश टेकाम, चंद्रासजी मोरे, रमेश चुधरी, अरुण बरडे, लक्ष्मण बैस, वाघ गुरुजी, लभाने ताई, देवानंद मोरे, त्रिशूल निबुधे, करण भुसारी, राहुल, पवन मेधराम, गणेश काळे, विजय खिरटकर, अविनाश पायघन आदींची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment