फलक व घोषवाक्याच्या माध्यमातून सर्पमित्रांची जनजागृती
भद्रावती : पर्यावरणाचा समतोल साधण्यासत हातभार लावणाऱ्या सापांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नागपंचमी हा कृषी संस्कृतीशी निगडित असलेला उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून सापांचे संरक्षण करण्याचा संदेश सर्वत्र पोहोचणे गरजेचे आहे. नैसर्गिक जैविविविधता आणि सजीव सृष्टी मध्ये साप अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नागपंचमीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सापांना संदर्भात असलेली भीती काढून टाकण्याची खरी गरज आहे. सांपान संदर्भात असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्पाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती या निमित्याने व्हावी हा उद्देश समोर ठेवून स्थानिक स्वयंसेवक व सर्पमित्र, सामाजिक संघटनेने फलकावर घोषवाक्य लिहून फलकाद्वारे भद्रावती नाग मंदिरात व परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री व ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांनी भद्रनाथ मंदिर येथे दर्शन घेण्याकरता आले असताना अनपेक्षित पणे फलक जनजागृती अभियानात सहभाग दर्शविला. प्रसंगी पोलीस निरीक्षक वर्मा, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र तिरानिक, वनविभाग आर.एफ.ओ. हरिदास शेंडे, एस. गेडाम, माजी पंचायत समिती सदस्य चिंतामण, डॉ.राहुल साळवे, चंद्रकांत गुंडावार, सुनील नामोजवार, किशोर गोवारदिपे, भद्रनाग देवस्थानचे अध्यक्ष डॉ.रमेश मिलमिले, उपाध्यक्ष योगेश पांडे, प्रकाश पामट्टीवार, आदींनी सहभाग दर्शवला. फलक व घोषवाक्य जनजागृती अभियानाचे सहयोजक नेफडोचे जिल्हा उपाध्यक्ष सर्पमित्र श्रीपाद बाकरे, राज येरणे, अनुप येरणे शुभम मुरकुटे, वैभव निंबाळकर, शितल मैसकर, दीपक सहदेव, अमर किनाके, संकेत सातभाई, अमृत बावणे, प्रणय पतंरगे स्वयंसेवक व सर्प मित्रांनी संबंधित भद्रावती परिसरात सांपान संदर्भात जनजागृती करत मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवीत सर्वसामान्य जनतेपर्यंत संदेश पोहोचविला.
Comments
Post a Comment