भद्रावती येथे नागपंचमी निमित्त भाविकांची गर्दी

भद्रावती येथे नागपंचमी निमित्त भाविकांची गर्दी

रवि बघेल भद्रावती
2/8/22

भद्रावती शहरात नागपंचमी निमित्त नाग मंदिर येथे भव्य यात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रा राज्यासह  मध्य प्रदेश तेलंगाणातून भावीक दर्शनासाठी येत असतात. भद्रावती तालुक्याच्या ग्राम दैवत म्हणजे भद्रनाग. अतिशय छोटं आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्र नागाच्या मूर्तीला लोकांमध्ये मोठं श्रद्धेचे स्थान आहे. हे मंदिर किमान एक हजार वर्षे जुनं असल्याचे पुरातत्त्व दाखले आहेत. सध्या अस्तित्वात असलेला हे मंदिर ११४६ साली बांधण्यात आलं.११४६साली भद्रनाग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला शिलालेख या ठिकाणी आजही आहे.हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आला आहे. मंदिराचा आकार छोटा असला तरी हे माडपंथी शैलीची सगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहे. मंदिराला भक्कम असे ३६ खांब आहेत. आणि ९ फणयांची शेषनागाची सुमारे अडीच फूट उंचीची मूर्ती आहे.मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटते .मात्रयावर्षी कोरोना संदर्भातील  सर्व निर्बंध सरकारने हटवल्यामुळे भद्रावती येथील भद्रनाग मंदिरात नागपंचमीची जोरदार यात्रा भरवण्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असणारा आहे. मंदिर परिसरात भाविकांनी स्वच्छ्ता राखण्यास मदत  करण्याची विनंती संस्थेने केली आहे. 

यासोबतच मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भद्रावती पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Comments