ABVP भद्रावती तर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*ABVP भद्रावती तर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*अभाविप कार्यकर्त्यांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी राखी बांधली.*

  भारतातील भाऊ आणि बहिणीचे अतुट नात सांगणारा उत्सव म्हणजे रक्षाबंधन हा सन आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत आहे व आपण हा वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहो.   पोलीस कर्मचारी व अधिकारी  हे एका योद्धप्रमाणे समाजाचे रक्षण करत असतात. त्यानिमित्य ThankYouWarriors या संकल्पनेतून त्यांचे मनोबल वाढावे व भारतीय महान परंपरा व संस्कृती अखंडित सुरू राहावी. याकरिता दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भद्रावती तर्फे  स्थानिक पोलीस स्टेशन भद्रावती येथे  रक्षाबंधनच कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना विद्यार्थिनींनी औक्षवन करून राखी बांधण्यात आली व महिला पोलीस आपल्या गावी जाऊ शकत नसल्याने त्यांनी सुद्धा अभाविप च्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना राखी बांधली. 
या दरम्यान पोलिस निरीक्षक अमोल कोल्हे व ईतर पोलीस अधिकारी यांना राखी बांधण्यात आली. या वेळी   अभाविप जिल्हा सहसंयोजक व नगर मंत्री जयेश प्रशांत भडगरे, नगर सह मंत्री यश चौधरी,संस्कार झाडे, गौरव पारधे आणि विद्यार्थीनि निविदिता मुजुमदार, पायल सागुळले, वैभवी बेहारे, उपस्थिती होते.

Comments