महावितरण चे असिस्टंट अभियंता चुक्का लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

श्रीणू चुक्का तुम्ही चुकले 

महावितरण चे असिस्टंट अभियंता चुक्का लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व त्यांच्या सहकाऱ्यांची कारवाई.


वरोरा २७/६/२२
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनिअर श्रीणू चुक्का यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 
सहा हजार रुपयाची लाच घेताना असिस्टंट अभियांता चुक्का यांना अटक करण्यात आली . फिर्यादी भरपूर दिवसापासून महावितरणकडे सौरऊर्जा संबंधित मिटरच्या कामासाठी जात होता परंतु प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणावरून माघारी पाठवत असे. शेवटी वैतागून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. व त्याप्रमाणे सापळा रचण्यात आला शेवटी 6000 रुपये देण्याचे चुक्का यांना ठरले. चुक्का सह अनेक अधिकारी यात गुंतून असल्याची शंका आहे.चुक्का यांनी सहा हजार घेतले आणि तीच चूक अभियंत्याच्या अंगावर आली. या पहिले सुद्धा बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु ठोस सबूत नसल्याने कोणीच काही करू शकले नाही. महावितरणमध्ये कोणतेही काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केल्या जाते. सौर मीटर लावण्यासाठी पाच हजार रुपये kV याप्रमाणे ठेकेदाराला पैशाची मागणी केली जाते. त्यामुळे वरोरा शहरातील सौर मीटरचे बरेच काम रखडले आहे. यामध्ये कमिशन एजंट नेमून काम करण्याचा पायंडा वरोरा महावितरण कंपनीने घातलेला आहे. यामध्ये बाबू पासून अधिकाऱ्यापर्यंत चैन सिस्टम लागू करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळे वरोरा महावितरण कंपनीमध्ये ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. वरोरा शहरातील नवीन कनेक्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते. मात्र उघडपणे आपले काम होणार नाही या भीतीने हा गैरव्यवहार अशाच पद्धतीने सुरू होता. या व्यतिरिक्त सुद्धा महावितरण कंपनीमध्ये बराच भोंगळ कारभार सुरू असल्याचे बोलले जाते. मग वरोरा महावितरण कंपनी मधील अधिकारी केल्या पाच वर्षापासून मलाई खात आहे. मात्र अजून पर्यंत यांच्या बदल्या होत नाही हे नवलच. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
लाचखोर अभियंता चुक्का यांना अटक झाल्यामुळे गरीब ग्राहकात समाधानाचे वातावरण आहे. प्रतिबंधक विभाग चंद्रपुर पोलीस पुढील कारवाई करत आहे.

Comments