चंद्रपुर आरटीओ नी नियमानुसार सर्वांवर कार्यवाही करावी,आकसापोटी हेतुपुरस्सर सुड उगवू नये

चंद्रपुर आरटीओ नी नियमानुसार सर्वांवर कार्यवाही करावी,आकसापोटी हेतुपुरस्सर सुड उगवू नये

सिराज शेख प्रहार सेवक यांची मागणी

रवि बघेल भद्रावती 

चंद्रपुर-नागपुर चंद्रपूर- चीमुर विना परमीट दररोज चालनार्या ट्रावल्स कडे डोळेझाक करत चिमुर क्रांतीकडे लक्ष.


चंद्रपुर-परिवहन विभागाने वाहनांची तपासणी करताना नियमानुसार सर्वांवर कार्यवाही करावी सर्वांना नियम सारखे ठेवून चौकशी करावी , आकसापोटी सूडबुद्धीने कुणावर सूड उगवू नये सर्वांना समान कायदा नियम सांगून कार्यवाही करावी अशी मागणी सिराज शेख प्रहारसेवक यांनी केली आहे 
         वाहतूक करण्यासाठी वाहने कश्या पद्धतीची असावी रस्त्यावर धावताना वाहनांची क्षमता नियमांना अनुसरून सर्व कागद पत्रे परवाना वाहतूकीची सर्व नियम पाळले जावे यासाठी प्रशासनाने परिवहन विभागाची निर्मिती केली आहे परिवहन विभाग हे रस्ता वाहतूकसाठी नियमांनी वाहनांची तपासणी करून परवाना देतात व वाहन हे वाहतुकीसाठी योग्य आहे किंवा नाही  क्षमतेपेक्षा जास्त वापर आहेका याची तपासणी करून कार्यवाही करतात असे अनेक काम परिवहन विभाग करीत असतो परंतु मागील अनेक दिवसांपासून चिमूर वरोरा चंद्रपूर मार्गावर चालणाऱ्या वाहनावर कार्यवाही करताना परिवहन विभाग सूडबुद्धीची हेतुपुरस्सर कार्यवाही करताना दिसत आहे नेमक्या मोजक्याच वाहनाला टार्गेट जरून कार्यवाही करताना दिसत आहे परंतु उल्लेखनीय बाब अशी की अनेक वाहनाकडे कागदपत्रे नाहीत त्यांच्याकडील परवाना परमिट सुद्धा नाही तरी पण त्या वाहणाकडे परिवहन विभाग हेतुपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे असा आरोप सिराज शेख यांनी केला आहे कायदा आणि नियम हे सर्वांना सारखे आहेत त्या नियमानुसार सर्व वाहनांची तपासणी व्हायला पाहिजे सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे पण परिवहन विभाग मनमानी कारभार करून काही वाहनांची मुद्दाम तपासणी करून नाहक त्रास देत आहेत.एसारके सारख्या कंपनी कड़े विना पेपर शेकडो ट्रक आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चिमुर क्रांतीकडे बारीक लक्ष ठेऊन सुळबुद्धीणे कार्रवाई करतात. तेव्हा चंद्रपुर परिवहन विभागाने सर्वांवर नियमानुसार तपासणी करून कार्यवाही करावी अन्यथा रस्त्यावर उतरून प्रहार स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार सेवक सिराज शेख यांनी दिला आहे.

Comments