श्रीणू चुक्का लाचखोर अभियंत्याला पुन्हा वाढीव पोलीस कोठडी

श्रीणू चुक्का लाचखोर अभियंत्याला पुन्हा वाढीव पोलीस कोठडी

संपत्तीची चौकशी होणार


वरोरा २९/६/२२
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनिअर श्रीणू चुक्का यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात सोमवारी पकडले होते. एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा बुधवारला वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शिल्पा भरडे यांनी कसून चौकशी करण्यासाठी दोन दिवसाची पोलीस कोठडी अजून मागितली आहे. या अभियंत्याकडे किती संपत्ती ल याचा अंदाज अजून पर्यंत लागू शकला नाही. महावितरणमधील चैन सिस्टम मधील लोक साहेबांची बेल करण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहे परंतु साहेबांना दोन दिवसाची वाढीव  पोलीस कोठरी मिळाल्याने वकीलामार्फत कसून प्रयत्न करीत आहे.
महावितरण कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले असून अधिकारी वसुली करण्याच्या नावावर टेबल वर बसत नाही. ग्राहकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून वरोरा महावितरण कार्यालयात सध्या अस्ताव्यस्त कारभार दिसून येत आहे.
हा सगळा प्रकार सौर ऊर्जा कॉन्ट्रॅक्टर मार्फत उघड करण्यात आला आहे. वरोरा तालुक्यात अजूनही 50 च्या वर सौर मिटर देण्याचे लक्ष असून हेतूपुरस्पर फाईल अडवून ठेवण्यात आले आहे. 
यामागील कारण विचारले असता विद्युत बिलावरतील मंजूर भार वाढवून देण्यासाठी एक किलो वॅट मागे एक हजार रुपये द्यावे लागत असे. यानंतर नवीन मीटर लावण्यासाठी मनाप्रमाणे पुन्हा पैसे द्यावे लागतात तेव्हा ती फाईल क्लियर होते हे सूत्र चेंन सिस्टमनुसार सुरू होते. या महावितरणच्या सिस्टमला कंटाळून अखेर या लाचखोर अभियंत्याला पोलिसांचा हिसका दाखवला मात्र अजूनही काही लाचखोर अधिकारी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व आयकर विभागाने कसून चौकशी केल्यास अजून नवीन घबाड मिळू शकते.

डिमांड भरून सुद्धा काही लोकांचे मिटर अजूनही न आल्याने ग्राहक चिंतेत आहे. अजून पर्यंत डिपार्टमेंटल कोणतीही कारवाई झालेली नसून महावितरण अधिकाऱ्यावर कोणताही अंकुश असल्याचे चित्र दिसून येत नाही.

Comments