आत्मा योजने अंतर्गत " किसान गोष्टी कार्यक्रम" संपन्न

आत्मा योजने अंतर्गत " किसान गोष्टी कार्यक्रम" संपन्न

रवि बघेल भद्रावती 

दिनांक 28/06/2022 रोज मंगळवार ला, स्थळ मंडळ कृषी अधिकारी कार्या. चंदनखेडा येथे "कृषि संजिवनी मोहीम" सप्ताह अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत "किसान गोष्टी कार्यक्रम" तालुका कृषी अधिकारी, भद्रावती मार्फत आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी श्री नयनभाऊ जांभुळे, सरपंच ग्राम पंचायत कार्या. चंदनखेडा उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती श्री आर जे मनोहरे, कृषी उपसंचालक जि.अ.कृ.अ, कार्या. चंद्रपूर तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा) चंद्रपूर, यांनी देऊन कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
       सदर कार्यक्रमामध्ये तालुक्यातील  कृषि भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री दत्तात्रय गुंडावार व प्रयोगशील शेतकरी श्री सुनील उमरे, श्री दत्तू येरगुडे, श्री बंडुजी ननावरे, श्री मारोती गायकवाड, श्री किशोर ठावरी, यांनी आपल्या शेती पध्दतीमध्ये वापरत असलेल्या तंत्रज्ञानाबाबत आपले अनुभव कथन केले.
श्रीमती महानंदा ढोके, सौ मनीषा ठावरी यांनी गटामार्फत चालू असलेल्या प्रक्रिया उद्योग बाबत माहिती दिली.
    उपस्थित शेतकऱ्यांना खतांचा संतुलीत वापर, पिकाची खत मात्रा बनविणे, सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्व, रासायनिक खतांच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच दशपर्णीअर्क, जीवामृत, गांडूळखत, नाडेप या बाबत श्री पी एम ठेंगणे, कृ प भद्रावती, श्री विजय कवाडे, कृ प चंदनखेडा, सौ एम एन ताजने, कृ प भद्रावती यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. मोहिनी जाधव, तालुका कृषी अधिकारी, भद्रावती यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री सुधीर हिवसे, स तं व्य भद्रावती यांनी केले.
   तसेच शिंगाडा लागवड प्रक्षेत्राला भेट देण्यात आली. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मित्र, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गटातील पुरुष व महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व सदस्य, अंबुजा फाउंडेशन, उमेद, माविम, गटातील महिला व शेतकरी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता श्री पी जी कोमटी, मं कृ.अ चंदनखेडा, श्री यु बी झाडे, मं कृ अ भद्रावती, श्री अनिल भोई, श्री कपिल शंकपाळे, श्री प्रदिप काळे व सर्व कृषि सहाय्यक यांनी सहकार्य केले.

Comments