श्रीणू चुक्का लाचखोर अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी
वरोरा २७/६/२२
चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे असिस्टंट इंजिनिअर श्रीणू चुक्का यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात सोमवारी पकडले होते. काल रात्रीपर्यंत चाललेल्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक कलम ७ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी बारा वाजताच्या दरम्या वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले यामध्ये त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागातर्फे पुढील चौकशी सुरु असून या अभियंत्याकडे किती संपत्तीचे विवरण सापडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment