वरोरा तहसील कार्यालयात स्वच्छतागृह नसल्याने पुरुषांसोबत महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मनसेचे प्रशांत झुंजारे यांचे निवेदन
वरोरा २३/६/२३
चेतन लूतडे
वरोरा तहसील कार्यालय येथे स्वच्छता गृह बांधावे या करिता मनसेने आक्रमक बनली असून यासंदर्भात वरोरा तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
वरोरा शहरात तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तालुक्यातील खेड्यातून व शहरातून महिला व पुरुष तहसील मधील संबंधित कामे करण्यासाठी कार्यालयात येतात.अशा रहदारिच्या ठिकाणी महिला व पुरुष वर्गा करिता स्वच्छता गृहाची व्यवस्था बऱ्याच वर्षापासून केली नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ही वरोरा शहराकरीता शोकांतिका असून, गेल्या कित्येक वर्षापासून स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारले गेले नाही. कामाकरता आलेले पुरुष तहसील कार्यालयाच्या चारही बाजूला लघुसंकेसाठी जातानी दिसतात. परंतु महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत झुंजारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली.
यानंतर लगेच संबंधित अधिकाऱ्याने या निवेदनावर दखल घेत लवकरच परिसरात स्वच्छतागृहांची निर्मिती करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे सह गौरव मेले , आनंद गेडाम,आकाश काकड़े,सत्या मांडवकर,हर्षल डोंगरे, शाहिद शेख,सचिन गाते, साहील झीले, आदि मनसैनिक उपस्थित होते
Comments
Post a Comment