भद्रावती बुद्ध लेणी उपासकांची बुद्धगया येथील आंतरराष्ट्रीय बैठकीला हजेरी बौद्ध देशांच्या तीर्थयात्रेची सुविधा देणार.
बौद्ध देशांच्या तीर्थयात्रेची सुविधा देणार.
रवि बघेल
भद्रावती - बिहार येथील बुद्धगया येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. गगन मलिक फाउंडेशन तर्फे देशात सदस्य बनविणे, कार्यकारिणी गठित करणे आदी विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या परिषदेला भद्रावती विजासन बुद्ध लेणी येथील विनय बोधी डोंगरे, जयदेव खाडे यांच्या नेतृत्वात उपासकांनी बुद्धगया येथे हजेरी लावली.
बिहारमधील बुद्धगया येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन बैठक थायलंड मेनी स्ट्रीमध्ये आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. गगन मलिक होते यावेळी देशात समतावादी समाज निर्मितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी 84 हजार बुद्धमूर्ती चे वितरण करण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी मोहन वाकोडे यांनी बैठकीत विविध ठराव मांडले.
भारतातील लाखो बुद्ध लोकांना बौद्ध देशांमध्ये यात्रा करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय गगन मलीक फाउंडेशन तर्फे घेण्यात आला.
या बैठकीला थायलंड मोनीस्ट्रीचे भंते महानंद मुनी महाथेरो फ्रामा, फाईप चिनावट . सिध्दार्थ हाथी अंबीरे गजभिये उपस्थित होते. भद्रावती येथील उपासक विनय बोधी डोंगरे, जय देव खाडे , सुरज गावंडे, गुणवंत सोनटक्के, प्रिय वंद वाघमारे, बि.डी. देशपांडे, एन. डी. मेश्राम लखोटे गुरुजी तसेच विविध राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment