प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा येथे रक्त दान शिबिर संपन्न.

प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा येथे रक्त दान शिबिर संपन्न.

ग्रामपंचायत व प्राथ. आरोग्य केंद्राचा संयुक्त उपक्रम

रवि बघेल भद्रावती 
     
 भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेले चंदनखेडा हे गाव नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबवित नेहमीच चर्चेत असते उन्हाळ्याच्या दिवसात रक्त पेटी मध्ये रक्ताची टंचाई निमार्ण होते बरेचश्या रुग्णांना रक्त मिळत नाही याची दखल घेत जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी जिल्ह्यातील युवा वर्गांना रक्त दान करण्यासाठी आव्हान केले होते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत उपक्रमशील असलेली सांसद आदर्श ग्राम पंचायत चंदनखेडा व प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक ३१/०५/२०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
या रक्त दान शिबिरात गावातील तसेच परिसरातील युवा रक्तदात्यांनी रक्त दान करून आपल्यावर असलेले समाज ऋन फेडले या रक्त दान शिबिराच्या उदघटनिय क्रर्यक्रमा प्रसंगी ग्राम पंचायत चंदनखेडा युव सरपंच  श्री नयन बाबाराव जांभुळे तसेच सामजिक कार्यकर्ता श्री सुधीर भाऊ मुडेवार तसेच उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे, तसेच सर्व ग्रामपंचयत सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बावनकर म्याडम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच रक्त दाते उपस्तीत होते.

Comments