खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आहेत. परंतु त्यामध्ये काम करीत असलेल्या कामगारांचे अधिकार व कर्तव्य त्यांना माहित नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या असंघटित कामगारांचे प्रश्न इंटक (असंघटित ) काँग्रेस मार्गी लावण्यात कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर इंटक काँग्रेस पदाधिकारी पदग्रहण सोहळा साठी
आमदार प्रतिभाताई धानोरकर, विदर्भ इंटक अध्यक्ष अर्चनाताई भोमले, कामगार नेते पांडेजी, वरोरा कृषी सभापती चिकटे, अनिकेत अग्रवाल जिल्हाध्यक्ष इंटक ( असंघटित ) काँग्रेस चंद्रपूर , माजी चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर शहर अध्यक्ष पदी मनोज मतकुलवार, चंद्रपूर तालुका अध्यक्ष पदी विजयभाऊ धोबे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष पदी सुरेश दूधगवळी, राजुरा तालुका अध्यक्ष पदी अक्षय डाखरे, कोरपना तालुका अध्यक्ष आशिष नामवाळे, जिल्हा सचिव पदी निखिल येलमुले, जिल्हा महासचिव पदी गजानन नागपूरे यांना पदे देण्यात आली. यावेळी पदाधिकारी व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.
Comments
Post a Comment