शासनाची वाढीव चना खरेदी साठी 18 जून शेवटची तारीख50 टक्के शेतकऱ्यांचा चना खरेदी अजूनही बाकीवरोरा मध्ये संतप्त शेतकर्‍यांचा भजन आंदोलन मोर्चावरोराचेतन लूतडेनाफेड तर्फे शेतकऱ्यांचा चना खरेदी न झाल्याने शेतकरी संतप्त झाले असून वरोरा शहरात या विरोधात घोषणाबाजी करत प्रहार समर्थक किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात भजन आंदोलन शहीद योगेश डाहूले स्मारकाजवळ करण्यात आले.तालुक्यातील 1477 शेतकऱ्यांच्या चना खरेदीसाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदी झाल्या होत्या. मात्र तेवीस तारखेला शासनाचे ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आले होते. यानंतर वाढिव चना खरेदीचे परिपत्रक मिळाल्यानंतर तीस तारखेला खरेदी सुरू करण्यात आली. मात्र नाफेडच्या ढिसाळ कारभारामुळे अजून पर्यंत चना खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी वरोरा येथील शहीद योगेश डाहुले स्मारकाजवळ भजन आंदोलन प्रहारचे किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात सुरु केले.बारदाना बाजार समिती जवळ कमी असल्याने नाफेड ची खरेदी होऊ शकली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील चना खरेदीसाठी बाजार समिती व दहा शेतकरी प्रोड्युसर कंपनी कार्यरत असून येत्या 18 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा चना खरेदी करण्याचा मानस बाजार समितीने दर्शवला आहे.परंतु तालुक्यातील 50% शेतकऱ्यांचा चना खरेदी झालेला नसून पाऊस सुरु होताच चना खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.वरोरा तालुक्यातील अंदाजे ९०० शेतकऱ्यांचा चना खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरोरा चौकाच्या मध्यभागात भजन आंदोलन करत निषेध दर्शविला.विदर्भात सर्वात जास्त चना पिकत असून शेतकऱ्याकडून हेक्टरी ७.५ क्विंटल चना नाफेड तर्फे खरेदी करण्यात येत आहे.तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हेक्‍टरी 15 क्विंटल दराने नाफेडची खरेदी असते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले.बाजार समितीने लवकरात लवकर चना खरेदी सुरू केली नाही तर प्रहार तर्फे अर्धनग्न आंदोलन करण्याची तंबी शेतकऱ्यांनी दिली आहे. *बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे यांची मागणी.* माजी सभापती चिकटे यांच्या प्रयत्नाने डीएमओ चंद्रपूर यांच्या सोबत वार्तालाप करून सिंदेवाई येथील १६ गाठे बारदाने त्वरित बोलवण्यात आल्याने खरेदी सुरू झाली आहे. पण शासनाच्या दिलेल्या मुदतीत चना खरेदी करणे शक्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चना खरेदीची 18 जून शेवटची तारीख असून शेतकऱ्यांच्या सोयीकरिता तारीख वाढवून देण्याची मागणी केली आहे.

शासनाची वाढीव चना खरेदी साठी 18 जून शेवटची तारीख

50 टक्के शेतकऱ्यांचा चना खरेदी अजूनही बाकी

वरोरा मध्ये संतप्त शेतकर्‍यांचा भजन आंदोलन मोर्चा

वरोरा
चेतन लूतडे

नाफेड तर्फे शेतकऱ्यांचा चना खरेदी न झाल्याने शेतकरी संतप्त झाले असून वरोरा शहरात या विरोधात घोषणाबाजी करत प्रहार समर्थक किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात भजन आंदोलन शहीद योगेश डाहूले स्मारकाजवळ करण्यात आले.


तालुक्यातील 1477 शेतकऱ्यांच्या चना खरेदीसाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदी झाल्या होत्या. मात्र तेवीस तारखेला शासनाचे ऑनलाइन पोर्टल बंद करण्यात आले होते. यानंतर वाढिव चना खरेदीचे परिपत्रक मिळाल्यानंतर तीस तारखेला खरेदी सुरू करण्यात आली. मात्र नाफेडच्या ढिसाळ कारभारामुळे अजून पर्यंत चना खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी वरोरा येथील शहीद योगेश डाहुले स्मारकाजवळ भजन आंदोलन प्रहारचे किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात सुरु केले.
बारदाना बाजार समिती जवळ कमी असल्याने नाफेड ची खरेदी होऊ शकली नाही. 


 चंद्रपूर जिल्ह्यातील चना खरेदीसाठी बाजार समिती व दहा शेतकरी प्रोड्युसर कंपनी कार्यरत असून येत्या 18 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा चना खरेदी करण्याचा मानस बाजार समितीने दर्शवला आहे.

परंतु तालुक्यातील 50% शेतकऱ्यांचा चना खरेदी झालेला नसून पाऊस सुरु होताच चना खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.वरोरा तालुक्यातील अंदाजे ९०० शेतकऱ्यांचा चना खरेदी झाला नाही. 

त्यामुळे शेतकऱ्यांनी वरोरा चौकाच्या मध्यभागात भजन आंदोलन करत निषेध दर्शविला.

विदर्भात सर्वात जास्त चना पिकत असून शेतकऱ्याकडून  हेक्टरी  ७.५ क्विंटल चना नाफेड तर्फे खरेदी करण्यात येत आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हेक्‍टरी 15 क्विंटल दराने नाफेडची खरेदी असते. 

त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले.

बाजार समितीने लवकरात लवकर चना खरेदी सुरू केली नाही तर प्रहार तर्फे अर्धनग्न आंदोलन करण्याची तंबी शेतकऱ्यांनी दिली आहे.


 *बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे यांची मागणी.* 

माजी सभापती चिकटे यांच्या प्रयत्नाने डीएमओ चंद्रपूर यांच्या सोबत वार्तालाप करून सिंदेवाई येथील १६ गाठे बारदाने  त्वरित बोलवण्यात आल्याने खरेदी सुरू झाली आहे. पण शासनाच्या दिलेल्या मुदतीत चना खरेदी करणे शक्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 चना खरेदीची 18 जून  शेवटची  तारीख असून शेतकऱ्यांच्या सोयीकरिता तारीख वाढवून देण्याची  मागणी केली आहे.

Comments