वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण. श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार

वरोरा येथे भव्य श्याम भजन संध्या संपन्न; भक्तीच्या रंगात रंगले भक्तगण.  श्री खाटूश्याम बाबा यांचे मंदिर वरोरा शहर लवकरच उभारणार वरोरा/ चेतन लूतडे/२९/३/२६  श्री खाटूश्याम बाबांच्या असीम कृपेने वरोरा नगरीत ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य रोषणाईत, मंगलमय वातावरणात द्वारकाधीश लाॅन  येथे संपन्न झाली. या वेळी श्री खाटू श्यामजींच्या भक्तीने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. प्रसिद्ध भजन गायक श्री. सागरजी व्यास (हैदराबाद) यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला एक वेगळीच शांती व प्रसन्नता दिली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत, अत्तराचा वर्षाव आणि बाबांचा अलौकिक दरबार पाहून भक्तीचा महासागर लोटल्याचा अनुभव वरोरा शहरातील भाविकांना आला. या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य वरोरा वाशीयांना लाभले, त्याबद्दल श्यामबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व वरोरा शहरात बाबाचे मंदिर बनविण्याचा मानस डॉक्टर सागर वजे यांनी व्यक्त केला आहे. "करने वाला श्माम करन वाला श्माम"  "हारे का सहारा बाबा श्माम हमारा.."  ...

वरोरा येथे भारतीय जनता पक्षा तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी...

*वरोरा येथे भारतीय जनता पक्षा तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी...!*

            स्थानिक वरोरा येथील महात्मा जोतिबा फुले चौक येथे आज दि.11/04/2022 ला श्री.अहेतेशाम अली(मा.नगराध्यक्ष-न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा)यांचा नेतृत्वात महान समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक,स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती निमित्य त्यांचा प्रतिमेस पूजन करून माल्यार्पण करन्यात आले, भारतीय जनता पक्षांचा पदाधिकारी व कार्यकरत्यांनी "अमर रहे - अमर अमर रहे मा.ज्योतिबा फुले अमर रहे अशी नारेबाजी केलि" या प्रसंगी बाबासाहेब भागडे,डॉ.भगवान गायकवाड,सुरेश महाजन,करन देवतळे,विनोद लोहकरे,राजुभाऊ दोडके,दिलीप घोरपडे,अक्षय भिवदरे,राजेश साकुरे,सौ.शुभांगीताई निम्बाळकर,सौ.सुषमा कराड,बशीर शेख,संजय राम,आशीष देवतळे,कुनाल नक्षिने,सुनिल जिलगिलवार,दिपक चौव्हान, सोबतच स्थानिक लोकांच्या उपस्थितित कार्यक्रम साजरा करण्यात आला..!

Comments