उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने बार मालक झाले गब्बर.

उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने बार मालक झाले गब्बर.

ग्राहकाची फसवणूक करणार्याची कोण घेणार दखल

वरोरा 8/2/2022
चेतन लूतडे

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू व्यवसाय अधिकृत रित्या सुरु झाला आहे. या पहिले हा व्यवसाय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बंदी असल्याने अवैधरित्या मोठ्या प्रमाणात सुरू होता.
त्यामुळे दारूचे दुष्परिणाम, दारूच्या वाढत्या किमती, अपघाताचे प्रमाण, तस्करी अशी वेगवेगळी कारणे देऊन जिल्ह्यातील दारू बंदी उठवण्यात आली. मात्र याचाच फायदा आता गब्बर झालेले बारमालक उचलत आहे. बार मालकाची दादागिरी सुरू झाली असून सर्विसच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे घेत आहे. टूबर्ग बिअर 150रू रुपयांची दारू 250रू विकली जाते. ति पण परमिट रूम च्या बाहेर . त्यामुळे बरीच गर्दी परमिट रूम व्यतिरिक्त हॉटेलवर दिसून येते. यावर अजून पर्यंत राज्य उत्पादन शुल्क कडून कोणतीही कारवाई झालेली नाही. 
ज्या व्यक्ती जवळ लायसन नाही त्यांना  दारू पिण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वन डे लायसन च्या नावावर टोकन देऊन इंट्री केली जाते. किंवा ईअरली लायसन धारकाच्या नावावर ही दारू ची एन्ट्री चढवली जाते. त्याच नावाने सुद्धा खोटे बिल बनवले जाते. हे रजिस्टर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तपासणीसाठी दिले जाते. हा काळाबाजार कित्येक वर्षापासून सुरू आहे.
त्यामुळे ग्राहकांनी पक्के बिल शॉप मालक व बार मालकाला मागणे बंधनकारक असल्याचे मत अधिकार्‍यांनी व्यक्त केले.

रॉयल स्टॅग (RS) मूळ किंमत 180 रुपये असताना 250 रूपयात विकली जात आहे.  यामध्ये कच्चे बिल देऊन शासनाचा टॅक्स चोरत आहे. यामध्ये MRP maximum retail price घ्या वर पैसे घेणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु कोणतीही कारवाई केल्या जात नाही.

दारूसेवन करणार्या व्यक्तीकडे लायसन नसून सुद्धा बारविक्रते अवैधरित्या मोठ्या प्रमाणात विक्री करत  आहे. प्रत्येक ग्राहकाच्या लायसन्स चे नंबर नोट करून हे रजिस्टर उत्पादन शुल्क विभागाकडे तपासणीसाठी नेले जाते . ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री केल्या जात आहेत. 
प्रत्येक बॉटलच्या मूळ किमतीच्या तुलनेत वाढ करून  विक्री सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयाचा शासनाचा महसूल महाराष्ट्रातील बारमालक हेतूपुरस्पर चुकवत आहे. सर्विस च्या नावाखाली बसायलाही जागा नसते.

उत्पादन शुल्क विभागाचा आशीर्वाद असल्याने बार मालकांचे फावत आहे.
जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाकडे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे कारणे सांगून जिल्ह्यामध्ये कागदी घोडे नाचवले जातात. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक कायद्याला बगल देऊन बारमालक काम करत आहे. 

पहिले अवैधरित्या दारूचा पैसा कमावण्याचा आरोप होत होता आता मात्र वैधरित्या पांढरपेशी बारमालक ग्राहकांची लूट करताना दिसत आहे.

Comments