शहरातून कोळशाची वाहतूक बंद करण्याचे आदेश पारीत.शिवसेनेच्या आंदोलनाला यश.

शहरातून कोळशाची वाहतूक बंद करण्याचे आदेश पारीत.

शिवसेनेच्या आंदोलनाला यश.
वरोरा
चेतन लूतडे


मागील काही दिवसापासून कोळशाची जड वाहतूक वरोरा शहराच्या मध्यभागातून सुरू होती. त्यामुळे माढेळी नाका ,कासम पंजा वार्ड, दत्त मंदिर वार्ड परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्मान झाल्या होत्या. या परिसरातील लोकांनी बरीच आंदोलन  केली होती. वारंवार संबंधित प्रशासनाकडे निवेदन  देऊन सुद्धा प्रशासनाला जाग येत नव्हती. 

मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांनी सेना स्टाईल हिसका दाखवताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. या महिन्यात माढेळीनाका  मार्ग दत्त मंदिर वरोराला  जाणाऱ्या सर्व ट्रकाना रात्री अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनिक बैठक बोलवण्यात आली होती.

 यानंतर  एक महिन्यानी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी कोळसा वाहतूक संदर्भातील रात्री पूरता मर्यादित आदेश रद्द केला. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम138(2) अन्वय उपविभागीय दंडाधिकारीने दिलेल्या अधिकारातून सुभाष शिंदे यांनी मूळ आदेश रद्द करून नवीन आदेश देत जड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश पारित केले. यामध्ये पोलीस व मुख्याधिकारी नगरपरिषद विभागाला कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिल्या आहे.

त्यामुळे या परिसरातील लोक आनंदी झाले असून आतापर्यंत कोणीच जनतेची बाजू समजून घेत नव्हते. मात्र शिवसेनेने आमचे प्रश्न जाणून घेतल्या बद्दल जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांचे आभार व्यक्त केले आहे.
यानंतर कोळसा आणि वाळू संदर्भातील जड वाहतूक या भागातून गेल्यास जनतेसोबत शिवसेना उभी राहणार असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आणि व्यक्त केले.

उपविभागीय कार्यालय वरोरा येथे सुभाष शिंदे यांनी संबंधित आदेश जिल्हा प्रमुख जिवतोडे यांना दिले असून यासंबंधातील प्रतीलीपी संबंधित विभागाला पाठविण्यात आलेली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे सह उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम , युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस मनीष जेठाणी, शहर प्रमुख संदीप मेश्राम, नगरसेवक दिनेश यादव, युवासेनेचे भूषण बुरीले,अलका पचारे,जोत्सना काळे, जोत्सना नागपूरे, अनिल गाडगे, गणेश जानवे,मानिष दोहतरे,सागर पिंपळशेंडे,पियुष जगताप राहूल दांरूडे,शिवा उईक व वार्डातील नागरिक बशिर शेख गफ्फार पठान, इमरान पठान, आकाश पिंगे,श्यामराव जरिले व शिवसेना पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments