एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उपविभाग वरोरा येथे नव्याने सुरू करावे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उपविभाग वरोरा येथे नव्याने सुरू करावे

आदिवासी बांधवांच्या योजना चांगल्या रीतीने राबविण्यासाठी वरोरा येथे उपविभागीय कार्यालय सुरू करावे

शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम यांची पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मागणी.

वरोरा
चेतन लूतडे

शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा आदिवासी समाजाचे नेते रमेश मेश्राम यांनी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आदिवासी बांधवासाठी वरोरा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय वरोरा येथे नव्याने सुरू करण्याबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर सुरू करण्याचा आग्रह धरला आहे.

वरोरा भद्रावती तालुक्यातील 300 गावामध्ये जवळपास 30 ते 40 हजार आदिवासी समाजातील लोकसंख्या असून आदिवासी समाजातील योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून चिमूर येथे पायपीट करावी लागत आहे. वरोरा भद्रावती तालुक्याच्या ठिकाणावरुन चिमूर गावाचे अंतर 70 ते 80 किलो मीटर दूर असल्याने महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तालुक्यातील आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने ते वारंवार चिमूर प्रकल्प कार्यालयात येणे-जाणे करू शकत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान व वेळ वाया जात आहे. त्यामुळे आदिवसि समाजा करिता महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या विविध योजनेपासून आदिवासी बांधव वंचित राहत आहेत.
या समस्येची जाणीव ठेवून आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी आदित्य ठाकरे पर्यावरण व पर्यटन मंत्री यांच्याकडे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय वरोरा येथील नव्याने उघडण्याबाबत चर्चा केली असून त्या संदर्भात निवेदन सादर केले आहे. 13 तारखेला पर्यावरण व पर्यटन मंत्रीआदित्य ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वरोरा येथे निवेदन देण्यात आले.ठाकरे सरकारने याबाबत मेश्राम यांना शब्द दिला असून येणाऱ्या काळात  आदिवासी मंत्री के सी पाडवी यांच्याशी सल्लामसलत करून लवकरात लवकर उपकार्यालय वरोरा येथे सुरू करण्यात येण्याची ग्वाही दिली.

Comments