टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव.

टेमुर्डा ग्रामपंचायतीच्या बकरी बाजार व आठवडी बाजाराचा 20 मार्च रोजी लिलाव. टेमुर्डा : येथील ग्रामपंचायत हद्दीतील बकरी बाजार व आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यांच्या आगामी २०२६-२७ या वर्षासाठी जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडणार आहे. हा लिलाव मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १२६ अन्वये ग्रामपंचायत सभागृह, टेमुर्डा येथे दिनांक 20 मार्च २०२६, शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६-२०२७ (दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७) या कालावधीसाठी हे बाजार ठेक्याने देण्यात येणार आहेत. लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुक ठेकेदारांना काही महत्त्वाच्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत. लिलाव प्रक्रिया व अनामत रक्कम : लिलावाच्या दिवशी सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत इच्छुक बोलीदारांची अनामत रक्कम स्वीकारली जाईल. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता प्रथम बकरी बाजाराच्या लिलावास सुरुवात होईल. बकरी बाजार लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठवडी बाजार (भाजीपाला व इतर) यासाठी लिलाव घेण्यात येईल. लिलावात सहभागी होण्यासाठी बकर...

वरोरा तालुक्यातील चंद्रपूर नागपूर महामार्गावरील पिंपळगाव जवळ अपघात

वरोरा तालुक्यातील चंद्रपूर नागपूर महामार्गावरील पिंपळगाव जवळ अपघात ट्रक, ट्रॅव्हल्स दुचाकी व कार असा अपघात झाला असून जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरोडा येथे नेण्यात आले.तिन जखमीना वरोरा येथे उपचार सुरू असून सध्या या अपघातामध्ये कोणीही दगावले नाही.
हा अपघात एका दूचाकी चालकांच्या चुकीने झाला.हा चालक कार चालकांच्या पूढे आल्याने त्याला वाचवण्यासाठी कार बाजूला घेत असताना डीवाईडरला लागून दुसऱ्या बाजूला फेकली गेली.
त्यामुळे नागपूर वरून येत असलेल्या ट्रक समोर फेकल्या गेली. त्वरित ट्रक चालकाने ब्रेक मारले
त्यामागे येत असलेल्या डिएनआर कंपनीच्या ट्रॅव्हल्स ने सुद्धा ब्रेक मारले. त्यामुळे हे दोन्ही वाहन अनियंत्रित होऊन रोडच्या बाजूला फेकले गेले. यामध्ये कोणतीही जीवित हनी झाली नसून कार मधील जखमीं निशा कोरडे मालेगाव, निशा कोरडे रा.मारेगाव,सुनिल गोवरदीपे ,प्रियंका तोडासे ह्या काय क्र. Mh40 AR8505 मधील रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले आहे.

Comments