शिवजयंती हा भारतीयांसाठी ऊर्जा देणारा दिवस – आ. प्रतिभाताई धानोरकर*

*शिवजयंती हा भारतीयांसाठी ऊर्जा देणारा दिवस – आ. प्रतिभाताई धानोरकर* 

वरोरा
चेतन लूतडे

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्‍य साधुन वरोरा येथील आनंदवन चौकात छावा ग्रुप तर्फे आयोजित सकाळी रक्तदान शिबीर व सायंकाळी व्याखान कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता रक्तदान कार्यक्रमाचे उदघाटण माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली यांनी केले या नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँक यांना बोलवण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये ८०  पुरुष व २० महिलांनी रक्तदान केले सायंकाळी व्याखान कार्यक्रमाचे उदघाटक क्षेत्रातील आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर , नितीनभाऊ मत्ते सदस्य खनिज प्रतिष्टान चंद्रपूर  , सभापती राजाभाऊ चिकटे , माजी पाणी पुरवठा सभापती छोटुभाऊ शेख  ,बोर्डां ग्रा.प.सरपंच ऐश्वर्या खामनकर ,शाहिद पाशा सामाजिक कार्यकर्ते ,सुधाकर कुंकुले मागर्दशक, ग्रुप चे अध्यक्ष आकाश लिगाडे, उपाध्यक्ष निहाल मत्ते, सचिव समिर देठे,हर्षद बोढणे, राहुल नन्नावरे,तुषार कडू मंगेश पुसदेकर व इतर सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यशीय मार्गदर्शन नितीन मत्ते   म्‍हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास शौर्याची, प्रामाणिकतेची, सर्व धर्मांचा आदर करण्‍याची शिकवण देणारा आहे. रय्यतेच्‍या कल्‍याणासाठी लढलेला हा जाणता राजा युध्‍दाला जाताना शेतक-यांच्‍या शेतातील भाजीच्‍या देठाला धक्‍का लागणार नाही असा कडक सुचना आपल्‍या सैन्‍याला द्यायचे. छत्रपतींची शिकवण आपल्‍या कृतीत, आचरणात आणुन देशहितासाठी जगण्‍याचा आहे.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिवजयंतीनिमित्त भारतीयांना ऊर्जा देणारा दिवस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना ५ सायकल वाटप व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच काही चिमुकल्यानी नृत्य व पोवाडे , गीत सादर केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपुर्ण छावा  ग्रुप सदस्य उपस्थित होते.


Comments