वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले वरोरा : वनविभागाने बुधवारी वरोरा वनपरिक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रांतर्गत शिंदोला गावात मोठी धडक कारवाई करत तब्बल १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने यापूर्वी १३ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावून जमिनीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधितांनी कोणतेही वैध पुरावे सादर न केल्याने वनविभागाने ही कारवाई केली. सर्व आरोपींवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कक्ष क्र. ७ अ मधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन आता सार्वजनिक हितासाठी वापरली जाणार आहे. अतिक्रमण मुक्त केलेल्या या जागेवर आता गावकऱ्यांच्या मागणीनुसार 'वैरण विकास (गवती कुरण)' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून स्थानिक दुग्ध...

वरोरा येथील बँक ऑफ इंडिया मध्ये दिवसाढवळ्या धाडशी चोरी

अंदाजे 16 लाख रुपये चोरून नेला चा संशय वरोरा तालुका प्रतिनिधी -शहरातील मार्केट परिसरात असलेली बँक ऑफ इंडिया शाखा वरोरा मधील दुपारी 3 वाजताच्या दरम्यान दोन व्यक्त मी कर्मचारी असल्याचे सांगून आतमध्ये घुसला आणि रोखपल रूम मध्ये शिरून पिशवीत पाचशे व दोनशे च्या नोटा घेऊन पसार झाला असल्याचे लक्षात आले . बँकेत सायरन वाजला परंतु त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची हालचाल करण्यात आली नाही मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले असतात त्या वेळेस तो चोर तिथून पळून गेल्याचे समजते

.अंदाजे 16 ते 17 लाख रुपये चोरीला गेले असावे असा अंदाज शाखा प्रमुख श्याम अत्तरगडे यांनीं सांगितले समजते.पोलीस चौकशी करीत आहे.

------

वरोरा 31/1/22 चेतन लूतडे

Comments