खाजगी शाळांकडून गणवेश-पुस्तकांसाठी पालकास सक्ती बंद; शासनाचे कडक निर्देश, नियमांचे पालन बंधनकारक

खाजगी शाळांकडून गणवेश-पुस्तकांसाठी पालकास सक्ती बंद; शासनाचे कडक निर्देश, नियमांचे पालन बंधनकारक बातमी: चेतन लूतडे  पुणे : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या परिपत्रकानुसार कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांना गणवेश किंवा शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. शासनाच्या ११ जून २००४ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. यापूर्वीही याबाबत परिपत्रके जारी करण्यात आली होती; मात्र काही ठिकाणी अजूनही सक्ती होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनाने हा विषय गंभीरतेने घेतला आहे. परिपत्रकानुसार, कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये. राज्य मंडळ, CBSE, ICSE इत्यादी शाळांनी अनुक्रमे NCERT, SCERT (बालभारती) किंवा संबंधित मंडळांनी मान्य केलेली पाठ्यपुस्तकेच वापरावीत. तसे...

चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची सदिच्छा भेट; माजी सहकार्याच्या आठवणींना उजाळा

चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची सदिच्छा भेट; माजी सहकार्याच्या आठवणींना उजाळा

बातमी: चेतन लूतडे 

चंद्रपूर, दि. ४ – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लोकप्रिय अध्यक्ष माननीय रवींद्रजी शिंदे यांनी आज जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपानी साहेब यांची त्यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीदरम्यान शिंदे यांनी आठवण करून दिली की, नोपानी साहेब पूर्वी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत असताना त्यांच्याशी अत्यंत स्नेहाचे संबंध होते. “तोच जिव्हाळा आणि आपुलकी साहेबांनी आजही कायम जपली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वरोरा येथील त्यांचा कार्यकाळ अत्यंत कौतुकास्पद राहिला असून, त्या काळातील धाडसी निर्णय त्यांच्या ‘दबंग’ कार्यशैलीची साक्ष देतात, असेही शिंदे म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्याची सूत्रे आता त्यांच्या सक्षम हाती आल्याने जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर पडेल, तसेच पोलीस प्रशासन व जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन अधिक संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करेल, असा विश्वास या भेटीत व्यक्त करण्यात आला.

अखेरीस, नोपानी साहेबांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी व चंद्रपूरमधील कार्यकाळासाठी शिंदे यांनी हार्दिक अभिनंदन करून मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

पश्चिम बंगाल, आसाम व पांडेचेरी येथील विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना. वरोरा भद्रावती क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करण देवतळे व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते

Comments