केसर आंबा लागवडीतून मिळवा भरघोस नफा; योग्य तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ

केसर आंबा लागवडीतून मिळवा भरघोस नफा; योग्य तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ बातमी: चेतन लूतडे  वरोरा : शेतकऱ्यांसाठी केसर आंबा लागवड ही एक फायदेशीर पर्याय ठरत असून योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पादनासोबत चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. केसर आंबा हा गोड, सुगंधी व बाजारात मोठ्या मागणीचा वाण असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केसर आंबा लागवडीसाठी गरम व कोरडे हवामान तसेच चांगल्या निचऱ्याची, सेंद्रिय कर्बयुक्त जमीन (pH 6.0 ते 7.5) योग्य मानली जाते. लागवडीपूर्वी १ मीटर x १ मीटर x १ मीटर आकाराचे खड्डे करून त्यात शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट व ट्रायकोडर्मा मिसळणे आवश्यक आहे. लागवड साधारणतः जून-जुलै महिन्यात करावी. झाडांमधील अंतर १० x १० मीटर किंवा ८ x ८ मीटर ठेवावे. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन सर्वाधिक उपयुक्त ठरते. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी देणे गरजेचे आहे. खत व्यवस्थापनात दरवर्षी प्रति झाड २०-२५ किलो शेणखत, १ किलो निंबोळी पेंड, तसेच यूरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरिएट ऑफ पोटॅश यांचा समतोल वापर करावा. ...

सायकलस्वार शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; चालक फरार

सायकलस्वार शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; चालक फरार
बातमी:
वरोरा : तालुक्यातील बोर्डा–जामगाव मार्गावर शिर नदीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण विठ्ठुजी जेनेकर (वय ५८), रा. दिंदोडा खुर्द (जामगाव) ता. वरोरा हे ५ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतातील आंबे सायकलवर घेऊन वरोरा येथे विक्रीसाठी गेले होते. आंब्यांची विक्री करून परत येत असताना दुपारी अंदाजे ४.०० ते ४.३५ वाजण्याच्या दरम्यान बोर्डा–जामगाव रोडवरील क्वॉलिटी बारसमोर, शिर नदीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे हलविले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.
या प्रकरणी मृताचे चिरंजीव प्रशांत रामकृष्ण जेनेकर (वय २७) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Comments