घरासमोर वादातून चुलत भावाने सायकलने हल्ला; जखमीची पोलिसांत तक्रार

घरासमोर वादातून चुलत भावाने सायकलने हल्ला; जखमीची पोलिसांत तक्रार बातमी:6/5/26 वरोरा : शहरातील राजीव गांधी वार्ड परिसरात घरासमोर झालेल्या वादातून चुलत भावाने सायकलने डोक्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासीर अहमद शेख (वय ४५, रा. राजीव गांधी वार्ड, वरोरा) हे मजुरीचे काम करतात व कामानिमित्त हैद्राबाद येथे जात असतात. ११ एप्रिल रोजी ते घरी परत आले होते. ४ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास ते घरासमोर उभे असताना त्यांचा चुलत भाऊ इस्ताक मुस्ताक शेख (वय ३५, रा. कर्मवीर वार्ड, वरोरा) तेथे आला. घराकडे वारंवार येण्याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान इस्ताक शेख हा मद्यधुंद अवस्थेत असून त्याने भावाच्या पत्नी संबंधित आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप आहे. त्यानंतर त्याने जवळ पडलेली लहान सायकल उचलून नासीर शेख यांच्या डोक्यावर मारली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. जखमी अवस्थेत त्यांनी तत्काळ दवाखान्या...

केसर आंबा लागवडीतून मिळवा भरघोस नफा; योग्य तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ

केसर आंबा लागवडीतून मिळवा भरघोस नफा; योग्य तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ
बातमी: चेतन लूतडे 

वरोरा : शेतकऱ्यांसाठी केसर आंबा लागवड ही एक फायदेशीर पर्याय ठरत असून योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भरघोस उत्पादनासोबत चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. केसर आंबा हा गोड, सुगंधी व बाजारात मोठ्या मागणीचा वाण असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केसर आंबा लागवडीसाठी गरम व कोरडे हवामान तसेच चांगल्या निचऱ्याची, सेंद्रिय कर्बयुक्त जमीन (pH 6.0 ते 7.5) योग्य मानली जाते. लागवडीपूर्वी १ मीटर x १ मीटर x १ मीटर आकाराचे खड्डे करून त्यात शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट व ट्रायकोडर्मा मिसळणे आवश्यक आहे.
लागवड साधारणतः जून-जुलै महिन्यात करावी. झाडांमधील अंतर १० x १० मीटर किंवा ८ x ८ मीटर ठेवावे. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन सर्वाधिक उपयुक्त ठरते. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी देणे गरजेचे आहे.
खत व्यवस्थापनात दरवर्षी प्रति झाड २०-२५ किलो शेणखत, १ किलो निंबोळी पेंड, तसेच यूरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरिएट ऑफ पोटॅश यांचा समतोल वापर करावा. झाडाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात छाटणी करून योग्य आकार देणे महत्त्वाचे आहे. तसेच मल्चिंग केल्यास जमिनीत ओलावा टिकून राहतो व तणांची वाढ कमी होते.
फळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी फुलोऱ्याच्या काळात झाडावर ताण येऊ देऊ नये. फळगळ टाळण्यासाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. तसेच फळांना कागदी पिशवी लावल्यास त्यांची गुणवत्ता सुधारते. फळांची तोडणी एप्रिल ते जून दरम्यान करावी.
कीड व्यवस्थापनात धिप्पा, मिली बग, फळ माशी, खोडकिडे व पान खाणारी अळी या प्रमुख किडी आढळतात. यासाठी स्पायनोसॅड, फिप्रोनिल, इमिडाक्लोप्रिड यांसारख्या औषधांची शिफारस करण्यात येते. तसेच निंबोळी अर्काची नियमित फवारणी, पिवळे चिकट सापळे लावणे व स्वच्छता राखणे हे उपाय प्रभावी ठरतात.
योग्य नियोजन, नियमित देखभाल व कीड नियंत्रण केल्यास केसर आंबा लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन व चांगला नफा मिळू शकतो.

Comments