कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

वरोरा तालुक्यात भीषण अपघात; हायवा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वरोरा तालुक्यात भीषण अपघात; हायवा धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
बातमी:

वरोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चरुरखटी गावाजवळ शनिवारी (दि. १ मे) रात्री घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांद्रा येथील रहिवासी सुनिल मानिक कुमरे (वय ४०) हे GMR कंपनीत हाउसकीपिंगचे काम करत होते. दि. १ मे रोजी दिवसभराची ड्युटी संपवून ते सायंकाळी घरी परतले. त्यानंतर दहेगाव येथे मित्राच्या धार्मिक कार्यक्रमासाठी ते आपल्या पॅशन प्रो (क्र. MH 34-KY-1097) दुचाकीने निघाले होते.

दरम्यान, रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास चरुरखटी गावाजवळील नाल्याजवळ त्यांच्या दुचाकीला आयसर हायवा (क्र. MH-34-CQ-1484) या दहा चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात हायवा चालकाच्या निष्काळजी व बेदरकार वाहन चालविण्यामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मृताच्या भावाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सुनिल कुमरे यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेची तोंडी तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
..........

बुद्ध पौर्णिमेचा पारंपारिक सण परिवारासोबत साजरा करताना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते सह पत्रकार बंधू.

Comments