वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा जवळ भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत सेक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल



वरोरा जवळ भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत सेक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा (जि. चंद्रपूर)2/4/26 : येथील पिंपळगाव पाटी येथे भरधाव ट्रॅव्हल्सने मोटारसायकलला धडक दिल्याने एका सेक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत नितेश नामदेव रहाटे (वय ३५, धंदा सेक्युरिटी गार्ड, रा. केम, ता. वरोरा) हे आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच ३१ डीवाय ६११२) ने वरोराकडे येत होते. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ४९ एटी ५६१४) चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना जबर धडक दिली. या अपघातात नितेश रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ अजय रामकृष्णजी रहाटे (वय ३२) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिला. यावरून पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार यांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहनांची तपासणी केली असून ट्रॅव्हल्स चालकाचा शोध सुरू आहे. अधिक तपास सुरू आहे.

Comments