वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

वरोरा पोलिसांची नागरी येथे कल्याण मटक्यावर कारवाई; एकाला अटक, ४१० रुपये जप्त

वरोरा पोलिसांची नागरी येथे कल्याण मटक्यावर कारवाई; एकाला अटक, ४१० रुपये जप्त

वरोरा (जि. चंद्रपुर) : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलीस बंदोबस्तात असतानाच वरोरा पोलिसांनी माढेळी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नागरी येथील बसस्टॉप चौकात छापा टाकला. या कारवाईत कल्याण मटक्याचे बनावट आकडे लावून सट्टापट्टीचा जुगार खेळवणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मडावी, रोशन तामसेटवार यांच्यासह पोहवा नंदकिशोर रमेश खनके यांनी माढेळी परिसरात पेट्रोलिंग सुरू होती. मुखबीराने सांगितले की, नागरी येथील बसस्टॉप चौकात बालाजी मंदिराजवळ सुनिल धात्रक नावाचा व्यक्ती कल्याण मटक्याच्या आकड्यांवर पैसे घेऊन सट्टापट्टीचा जुगार खेळवत आहे.

यावरून पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले. स्थानिक पंच यांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन छापा टाकला. तेव्हा एक व्यक्ती झाडाखाली बसून सट्टापट्टीचा जुगार खेळताना आढळला. इतर संशयित पळून गेले, मात्र पोलिसांनी सुनिल रमेश धात्रक (वय ३३, धंदा मजुरी, रा. नागरी, ता. वरोरा) याला रंगेहाथ पकडले.

आरोपीकडून पोलिसांनी रोख ४०० रुपये (कल्याण मटक्यावर लावलेले पैसे), एक निळ्या रंगाची पेन (आकडे लिहिण्यासाठी) व एका मराठी आकड्यात लिहिलेली सट्टापट्टीची चिठ्ठी असा एकूण ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सकाळी ११ ते ११.४५ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा नंदकिशोर खनके करीत आहेत.

Comments