बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

शेती-पैशाच्या वादातून मुलानेच वडिलाची केली हत्या

शेती-पैशाच्या वादातून मुलानेच वडिलाची केली हत्या

वरोरा, दि. २९ एप्रिल – वरोरा शहरात शेती व पैशावरून झालेल्या भांडणात पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहता हॉल जवळील ‘चीरघर’ प्लॉट परिसरात मंगळवारी (दि. २८ एप्रिल) ही हृदयद्रावक घटना घडली.

नामदेव जीवतोडे (वय ५५) व त्यांचा मुलगा पियुष उर्फ गोलू जीवतोडे यांच्यात काही दिवसांपासून शेती आणि पैशांच्या वादावरून तणाव होता. मंगळवारी वाद विकोपाला गेला असता, रागाच्या भरात आरोपी मुलाने धारदार शस्त्राने वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. घराच्या स्लॅबवरून वडील पडले व जखमी झाले असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीने केला मात्र पोलिस तपासात हत्या उघडकीस आली.

गंभीर जखमी अवस्थेत नामदेव यांना वरोरा येथून चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डोक्यास व शरीराच्या महत्त्वाच्या भागास झालेल्या दुखापतींवर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर वरोरा पोलिसांनी व एलसीबी चंद्रपूर यांनी तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत आरोपी गोलू जीवतोडे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
......

Comments