वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

चंद्रपुरातील डॉ. मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरण उघड — एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार

चंद्रपुरातील डॉ. मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरण उघड — एक आरोपी ताब्यात, दुसरा फरार

अंकूश अवथे चंद्रपूर 

चंद्रपुर शहरातील डॉ. मुंधडा हॉस्पिटलमध्ये झालेल्या ६० हजार रुपयांच्या चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणात एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. चोरीची रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

........ जाहिरात 

दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी मनिष गोपाल मुंधडा (वय ४८ वर्ष, रा. दिक्षीत वार्ड, पंचशील वार्ड, चंद्रपूर) यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार दिली. दिनांक ०४ एप्रिल रोजी रात्री अज्ञात इसमाने हॉस्पिटलच्या केबिनमध्ये प्रवेश करून लाकडी आलमारीतील ६० हजार रुपये चोरी करून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.

या प्रकरणी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे  अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विनोद भुरले यांनी पथकासह तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून आरोपी श्रीकांत उर्फ बोटतुट्या राजू चुनारकर (वय २३ वर्ष, रा. आनंदनगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर) यास ताब्यात घेतले.
आरोपीकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली असून त्यास पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अतुल उर्फ मुजोर विकास राणा (वय २५ वर्ष, रा. शामनगर, चंद्रपूर) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.
.........

Comments