वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

शेगाव रोडवर भीषण अपघात : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक, एक जण ठार, एक गंभीर

शेगाव रोडवर भीषण अपघात : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक, एक जण ठार, एक गंभीर

वरोरा, दि. 7 एप्रिल – वरोरा येथून चिमूर -शेगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर पद्मावार राईस मिल जवळ आज सकाळी दहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. विना नंबरच्या ट्रॅक्टर व ट्रॉली वेगातील दुचाकीला समोरासमोर धडकल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. यातील एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महालगाव येथील स्वप्नील बदकी यांच्या मालकीचे महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर व विना नंबर ट्रॉली पद्मावार राईस मिलकडे वळण घेत असताना, वरोराकडून शेगावकडे येणाऱ्या वेगातील दुचाकी (क्र. MH 34 BS 1887) ने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दुचाकीचा वेग इतका अधिक होता की ती सरळ ट्रॅक्टरच्या समोरील चाकाखाली फसली.

या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी स्वामी मलय्या यमलू (वय ३४, रा. भद्रावती) यांना मृत घोषित केले. तर दुसरा जखमी संतोष राजू पवार (वय १८, रा. भद्रावती) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच  शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दुचाकीवरील दोघेही विना हेल्मेट होते. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
..............

Comments