कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार

  कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार बातमी:warora वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे राहणारे नरेंद लटारी थेरे (वय 40, ड्रायव्हर) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे की, त्यांच्या पुतण्या प्रज्वल प्रमोद थेरे याने एक वर्षापूर्वी उसने घेतलेले 10,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. नरेंद यांच्या म्हणण्यानुसार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावाच्या नंदोरी येथील घरी गेले असता, त्यांनी पुतण्याकडे पैसे परत मागितले. त्यावरून भांडण झाले आणि प्रज्वलने लाकडी काठी आणून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, मांडीवर व हातावर प्रहार केले. दरम्यान, भाऊ आणि वहिनीने हस्तक्षेप करून काठी हिसकावून घेतली. मात्र, प्रज्वलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नरेंद यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .................

स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतीदिना निमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतीदिना निमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

वरोरा : चेतन लूतडे 
लोकनेते माजी मंत्री स्व. संजयजी देवतळे यांच्या स्मृतीदिना निमित्त भव्य नि:शुल्क सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिर तसेच आयुष्यमान कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

स्व. संजयजी देवतळे हे महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री असून त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात गरजू आणि वंचित घटकांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार तपासणी, कॅन्सर निदान, मोतीबिंदू तपासणी, हाडे व शरीरातील विविध आजारांचे निदान तसेच विविध रक्त तपासण्या करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिर आणि आयुष्यमान कार्ड वितरण करण्यात येणार असून विविध शासकीय आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांना दिली जाणार आहे.
सदर शिबिर दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा येथे सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे विनित आमदार करण संजय देवतळे असून आयोजन स्व. संजय देवतळे मित्र परिवार व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments