निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा बातमी: वरोरा : निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या निकृष्ट रस्त्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांत उखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकार तर्फे ठेकेदारा मार्फत रोड बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम करण्यात येत असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डांबराऐवजी वेस्टेज ऑईलचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या प्रकाराला “बनावट विकास” असे संबोधले आहे. रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे की, तो हातानेही उखडला जात असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. दरम्यान, या रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनामध्ये साटेलोटे असल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे...

खांबाडा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 21 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल

खांबाडा येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांची धाड; 21 शिश्या जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल

बातमी: प्रतिनिधी

वरोरा : तालुक्यातील खांबाडा येथे अवैध दारू विक्री करत असलेल्या व्यक्तीवर वरोरा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई 26 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलीस हवालदार विक्की सदाशिवराव करपे (ब. नं. 732) व पोलीस अंमलदार सतीश निखाडे (ब. नं. 1617) हे खांबाडा बिट परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, खांबाडा येथील प्रकाश विश्वनाथ सिडाम (वय 42) हा आपल्या घरासमोरील कॅनल पुलाजवळ अवैधरित्या दारू बाळगून विक्री करत आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाड टाकली. तेथे संशयित इसमाकडे लाल रंगाची कापडी पिशवी आढळून आली. पंचासमक्ष तपासणी केली असता त्या पिशवीत 21 नग देशी दारूच्या सिलबंद शिश्या (प्रत्येकी 90 मि.ली.) आढळून आल्या. या शिश्यांची किंमत सुमारे 840 रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सदर दारू जप्त केली. तसेच नमुना शिशी सील करून तपासासाठी ठेवण्यात आली. पंचनामा सायंकाळी 6.35 ते 7.35 वाजेदरम्यान करण्यात आला.
या प्रकरणी प्रकाश विश्वनाथ सिडाम याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम 65 (ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.
............

Comments