वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

वरोरा, दि. 26 मार्च – येथील बोरी गावात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. जखमी तरुणावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, अक्षय  बोढे (वय २८, व्यवसाय ड्रायव्हर, रा. बोरी) हे २४ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्र मोहन विकास बलकी याच्या मोटरसायकलवरून घरी जात होते. यावेळी गावातील मंगेश वाढई याने त्यांना थांबवून मोहन बलकीशी जुन्या वादावरून भांडण सुरू केले. अक्षय यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मंगेश वाढई याने त्यांना शिवीगाळ करून शर्टच्या कॉलरने ओढत आपल्या घराच्या वॉलकंपाऊंडमध्ये नेले व लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले.

डोक्यातून रक्त सुटत असताना अक्षय हे बाहेर आले. तेथे आलेल्या त्यांच्या भावाने जगदीश बोढे यांनी त्यांना प्रथम माडेळी येथील सरकारी दवाखान्यात नेले, जिथून त्यांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Comments