वरोरात T20 विश्वचषक सट्ट्याचे जाळे; युवकांसह शाळकरी मुलेही आमिषाला बळी चे

वरोरात T20 विश्वचषक सट्ट्याचे जाळे; युवकांसह शाळकरी मुलेही आमिषाला बळी

वरोरा (प्रतिनिधी): टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वरोरा शहरात ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याचे रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. कमी वेळात श्रीमंत होण्याच्या आमिषाने हजारो रुपये मोजून युवक या जाळ्यात अडकत असतानाच शालेय विद्यार्थीही या अवैध धंद्याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
कसा चालतो सट्टा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या बुकींनी ऑनलाइन पद्धतीने सट्टा खेळण्याचे तंत्र विकसित केले आहे. इच्छुक सट्टेबाजाला 5 ते 10 हजार रुपयांमध्ये एक आयडी व पासवर्ड देण्यात येतो. या आयडीद्वारे खेळाडू थेट क्रिकेट सामन्यातील प्रत्येक चेंडूवर बॅटिंग लावू शकतो. खाया-लगाया या कोडवर्ड मध्ये फोनवर व्यवहार केला जातो. पैशांचे व्यवहार हे डिजिटल पद्धतीने होत असल्याने पोलिसांच्या नजरेतून हे व्यवहार सहज लपत आहेत. Www.Nice777.fun व www.purplebook9.com या नावाने असलेल्या वेबसाईटवर हा अवैध सट्टा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. मागील वर्षी सुद्धा या साईटवर कारवाई करण्यात आली होती मात्र तात्पुरती बंद करून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

हा ऑनलाईन आयडी लॉक करून बुकी सट्टा लावणाऱ्या खेळाडूंना जिंकून देत नाही. या वेबसाईटवर बुकेचे नियंत्रण असते. त्यामुळे मर्जीप्रमाणे हा खेळ खेळवला जातो. हे बहुतेक सट्टा लावणाऱ्या युवकांना माहीत नसते. त्यामुळे बरेच युवक या खेळाला बळी ठरत आहे.
.          या पद्धतीने ऑनलाईन रेट पहिले जातात.

प्र.त्येक चौकात सट्टेबाज
वरोरा शहरातील आनंदवन चौक, मिलन चौक, गांधी चौक, रेल्वे स्टेशन एरिया, रत्नमाला चौक या ठिकाणी मॅच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाण-घेवाण होत असते.व परिसरातील खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे जाळे पसरले आहे. शहरातील प्रत्येक चौकात सट्टा लावणाऱ्या व घेणाऱ्या तरुणांचा गोतावळा दिसतो. केवळ क्रिकेटच नव्हे, तर मटका सट्टाही मोठ्या प्रमाणात खेळवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा सट्टाबाजार सुरू असूनही प्रशासनाची दुर्लक्षित वृत्ती यामुळे सट्टेबाज अधिकच आक्रमक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बुकींचे लोकेशन ट्रॅक करून कारवाईची मागणी.
सट्टेबाजीचे हे रॅकेट चालविणारे बुकी स्वतःचे मोबाइल लोकेशन बंद करून किंवा शहराबाहेर जाऊन व्यवहार करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक बाबींचा वापर करून ही लोकेशन ट्रॅक करावीत, तसेच या सट्टेबाजांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यामुळे शहरातील तरुण पिढीचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असून शालेय विद्यार्थी या व्यसनाच्या जाळ्यात अडकत असल्याची गंभीर चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.
...............






Comments