खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

वरोरा शहरात मोकाट जनावरांची दहशत; नागरिक भयभीत, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप


 वरोरा शहरात मोकाट जनावरांची दहशत; नागरिक भयभीत, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

वरोरा : शहरातील सरदार पटेल वार्ड परिसरात मोकाट गायी आणि कुत्र्यांमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात एक मोकाट गाय फिरत असून, ती लहान मुलांसह जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना शिंग मारत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच मोकाट कुत्र्यांच्या वावरण्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही मोकाट गाय विशेषतः भर चौकात आणि रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि प्रौढांनाही गायीच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. या भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढला असून, त्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या तक्रारी आहेत. स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी नगरपालिकेला वेळोवेळी तोंडी सूचना दिल्या; मात्र आजतागायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

वरोरा नगरपालिकेने बेवारस (मोकाट) जनावरे पकडण्यासाठी नागपूर येथील ठेकेदाराला कंत्राट दिले असून, शंभर कुत्र्यांसाठी 'डॉग सेंटर होम' तयार करण्यात येत असल्याचे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मोकाट जनावरे पकडून ठेवण्यासाठी नगरपालिकेची कांजी देखील उपलब्ध आहे. मात्र, या सुविधा असतानाही ठेकेदार कंत्राटाप्रमाणे काम करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असल्याने संबंधित ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून मोकाट कुत्रे आणि गाय तात्काळ पकडून कांजीत किंवा गोरक्षण केंद्रात हलविण्याची मागणी केली आहे. 

उपजिल्हा रुग्णालय वरोरा
कुत्रा चावल्यानंतर जखमा झालेल्या रुग्णांस सिरम चे औषध द्यावे लागते ती उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपलब्ध नाही त्यामुळे पेशंटला चंद्रपूर येथे हलवावे लागते. वरोरा शरहात ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

Comments