प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. संजय जिवतोडे यांच्या पत्नी स्मिताताई यांचा सदिच्छा भेट; अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्याकडून सत्कार

 चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. संजय जिवतोडे यांच्या पत्नी स्मिताताई यांचा सदिच्छा भेट; अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्याकडून सत्कार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते स्व. संजय जिवतोडे उर्फ भाऊ यांच्या आठवणींना आज पुन्हा उजाळा मिळाला. त्यांच्या निधनानंतर त्यांचा विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या पत्नी स्मिताताई संजय जिवतोडे यांनी आज बँकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते यावेळी स्मिताताई जिवतोडे आणि त्यांच्यासोबत आलेले विशाल खांडरे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आणि कौटुंबिक स्नेही या नात्याने रवींद्र शिंदे यांनी स्मिताताईंचे स्वागत केले. यावेळी त्यांनी राष्ट्रसंतांच्या पावन 'ग्रामगीता'ची प्रत आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेली 'भगवी टोपी' भेट देऊन सन्मान केला. यावेळी अध्यक्ष शिंदे यांच्या मनातील कृतज्ञता आणि आदरभावना उफाळून आल्या.

यावेळी बोलताना अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "स्व. संजयभाऊ जिवतोडे हे केवळ बँकेचे अध्यक्ष नव्हते, तर सहकार क्षेत्रातील माझे मार्गदर्शक होते. त्यांनी सहकार क्षेत्रात येण्याची दिशा दाखवली. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आम्ही सर्वजण बँकेचा विस्तार करत आहोत. भाऊंनी लावलेले सहकाराचे रोपटे आता वटवृक्ष होत आहे. 'सहकारातून समृद्धीकडे' नेण्याचा वसा आम्ही पूर्ण करू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल," असे शिंदे म्हणाले.

स्मिताताई जिवतोडे यांच्या आगमनाने बँकेच्या कार्यालयात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बँकेतील महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments