वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

: जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा

: जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा

तातडीची बातमी:
राज्याचे हवामान खाते (मंत्रालय, मुंबई) यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. पुढील तीन तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची गडगडाटी वादळे येण्याची शक्यता आहे.

ही वादळे पृष्ठभागावरील वाऱ्यांसह (३० ते ४० किमी प्रति तास या वेगाने) येतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी किंवा विजेच्या खांबांखाली उभे राहू नये, असा सल्ला प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

Comments